वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
स्वागत आहे
यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या वेगवेगळ्या भाषांमधील प्रकाशनांमध्ये संशोधन करयासाठी हे एक साधन आहे.
प्रकाशने डाऊनलोड करण्यासाठी कृपया jw.org पाहा.
घोषणा
नवीन भाषा उपलब्ध: Betsileo
  • आज

शनिवार, २५ ऑक्टोबर

शाफान ते पुस्तक राजासमोर वाचू लागला.—२ इति. ३४:१८.

योशीया राजा जेव्हा २६ वर्षांचा झाला तेव्हा त्याने यहोवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं. हे काम करत असताना त्याला “यहोवाने मोशेद्वारे दिलेलं नियमशास्त्राचं पुस्तक सापडलं.” या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी ऐकल्यानंतर तो त्यांप्रमाणे बदल करायला लगेच तयार झाला. आणि त्याने ते करण्यासाठी पावलंही उचलली. (२ इति. ३४:१४, १९-२१) तुम्हीही कदाचित रोज बायबल वाचत असाल आणि ते वाचायला तुम्हाला नक्कीच आवडत असेल. तुम्हाला ज्या वचनांमुळे मदत होऊ शकते अशी वचनं तुम्ही कुठेतरी लिहून ठेवता का? योशीया जेव्हा जवळपास ३९ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या हातून खूप मोठी चूक झाली. आणि त्यामुळे त्याला त्याचा जीवही गमवावा लागला. यहोवाकडून मार्गदर्शन घेण्याऐवजी तो स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहिला. (२ इति. ३५:२०-२५) यातून आपल्याला एक खूप महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे, आपलं वय कितीही झालं असलं किंवा आपण कितीही वर्षांपासून बायबलचा अभ्यास करत असलो, तरीही आपण यहोवाकडून मार्गदर्शन मिळवलं पाहिजे. यहोवाकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण नियमितपणे त्याला प्रार्थना केली पाहिजे, त्याच्या वचनांचा अभ्यास केला पाहिजे आणि इतर प्रौढ ख्रिश्‍चनांकडून जो सल्ला मिळतो तो ऐकला पाहिजे. असं केलं तर कदाचित आपण मोठमोठ्या चुका करण्यापासून दूर राहू आणि आपला आनंदही वाढेल.—याको. १:२५. टेहळणी बुरूज२३.०९ १२ ¶१५-१६

शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२५

रविवार, २६ ऑक्टोबर

देव गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लोकांवर तो अपार कृपा करतो.—याको. ४:६.

बायबलमध्ये अशा बऱ्‍याच स्त्रियांबद्दल सांगितलंय, ज्यांचं यहोवावर प्रेम होतं आणि ज्यांनी विश्‍वासूपणे त्याची सेवा केली. या स्त्रिया “संयमी” आणि “सर्व बाबतींत विश्‍वासू” होत्या. (१ तीम. ३:११) इतकंच नाही, तर तुम्हाला तुमच्या मंडळीतही अशा प्रौढ ख्रिस्ती स्त्रिया दिसतील, ज्यांचं तुम्ही अनुकरण करू शकता. तरुण बहिणींनो, तुमच्या ओळखीच्या कोणी प्रौढ ख्रिस्ती बहिणी आहेत का, ज्यांच्या उदाहरणाचं तुम्ही अनुकरण करू शकता? त्यांच्यातले सुंदर गुण ओळखायचा प्रयत्न करा आणि आपल्यालाही ते गुण कसे दाखवता येतील याचा विचार करा. नम्रतेचा गुण एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती बनण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जी बहीण नम्र असते, तिचं यहोवासोबत आणि इतरांसोबत चांगलं नातं असतं. (याको. ४:६) उदाहरणार्थ, ज्या बहिणीचं यहोवावर प्रेम आहे, ती नम्रतेने १ करिंथकर ११:३ मध्ये सांगितलेल्या तत्त्वाचं पालन करते. आणि मंडळीत व कुटुंबात ज्यांना अधिकार दिला आहे त्यांच्या ती अधीन राहते. टेहळणी बुरूज२३.१२ १८-१९ ¶३-५

शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२५

सोमवार, २७ ऑक्टोबर

पती जसा स्वतःच्या शरीरावर प्रेम करतो तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावं.—इफिस. ५:२८.

एका पतीकडून यहोवा अपेक्षा करतो, की त्याने त्याच्या पत्नीवर प्रेम करावं आणि तिच्या शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण कराव्यात. विचारशक्‍ती वाढवल्यामुळे, स्त्रियांचा आदर केल्यामुळे आणि भरवशालायक असल्यामुळे तुम्हाला एक चांगला पती बनता येईल. तुमचं लग्न झाल्यावर कदाचित तुम्ही मुलं होऊ द्यायचा निर्णय घ्याल. एक चांगला पिता होण्यासाठी तुम्ही यहोवाकडून बरंच काही शिकू शकता. (इफिस. ६:४) यहोवाचं आपल्या मुलावर, येशूवर प्रेम आहे आणि तो त्याच्यावर खूश आहे हे त्याने त्याला उघडपणे सांगितलं. (मत्त. ३:१७) तुम्ही पुढे एक पिता बनला, तर तुमच्या मुलांवर तुमचं प्रेम आहे या गोष्टीची वेळोवेळी त्यांना खातरी करून द्या. तसंच, त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी त्यांचं नेहमी कौतुक करा. जे वडील यहोवाच्या उदाहरणाचं अनुकरण करतात, ते आपल्या मुलांना प्रौढ ख्रिस्ती बनण्यासाठी मदत करत असतात. तुम्ही आत्तापासूनच या जबाबदारीसाठी तयारी करू शकता. त्यासाठी तुम्ही आपल्या कुटुंबातल्या लोकांची आणि मंडळीतल्या भाऊबहिणींची काळजी घेऊ शकता. त्यांच्यावर तुमचं प्रेम आहे आणि त्यांची तुम्ही कदर करता, हे त्यांना तुम्ही बोलून दाखवू शकता.—योहा. १५:९. टेहळणी बुरूज२३.१२ २८-२९ ¶१७-१८

शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२५
स्वागत आहे
यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या वेगवेगळ्या भाषांमधील प्रकाशनांमध्ये संशोधन करयासाठी हे एक साधन आहे.
प्रकाशने डाऊनलोड करण्यासाठी कृपया jw.org पाहा.
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा